आयुष्य जगण्याचे माझे ध्यास वेगळे होते
केलेले हे मन्मनाशी कयास वेगळे होते |
ओघळत्या स्वेदधारांची सर यावी कशाला ?
सोन्या-रुप्या कष्टाचे घास वेगळे होते |
मरुस्थली मृगापरी जल धुंडीत होतो
ते जीवनाने फेकलेले फास वेगळे होते |
बेईमानांनी सारी दुनिया भरली होती
प्रामाणिकास झालेले त्रास वेगळे होते |
आजकाल जो तो रतीब टाकतो शब्दांचा
शब्द 'गौरव'चे काही खास वेगळे होते |
- गौरव पांडे
ध्यास
जून २००७
केलेले हे मन्मनाशी कयास वेगळे होते |
ओघळत्या स्वेदधारांची सर यावी कशाला ?
सोन्या-रुप्या कष्टाचे घास वेगळे होते |
मरुस्थली मृगापरी जल धुंडीत होतो
ते जीवनाने फेकलेले फास वेगळे होते |
बेईमानांनी सारी दुनिया भरली होती
प्रामाणिकास झालेले त्रास वेगळे होते |
आजकाल जो तो रतीब टाकतो शब्दांचा
शब्द 'गौरव'चे काही खास वेगळे होते |
- गौरव पांडे
ध्यास
जून २००७
wah..!!!!
ReplyDeletebarobar varta kelis..
atisundar..!