कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या मुखवट्याखाली
मी कितीदा रडलोय ते?
नोटांच्या चळतीकडे धावताना
जाणवतोय का कुणाला
पायांखाली कुस्करलेला पारिजाताचा सडा ?
या मद्यधुंद जल्लोषात
ठेवली आहे का कुणी
एखाद्या श्रांत क्षणी दिलेल्या
ओंजळभर पाण्याची आठवण?
रोजच्या तासा-मिनिटांच्या गणितांत
जपलाय का कुणी ऊराशी
एखादा अश्रूभिजला क्षण ?
रणरणत्या ऊन्हातही
जागवलाय का कुणी मनात
तो पहिला वेडा पाऊस ?
विचारलंय का कुणी स्वत:ला
डोळाभरून चंद्र पाहून
किती दिवस लोटलेत ते ?
कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या मुखवट्याखाली
मी कितीदा रडलोय ते?
- गौरव पांडे
- गौरव पांडे
mastach ...chan zali aahe kavita...aajun yeu de..
ReplyDeletekhup chhan
ReplyDeletekeep it up....
Dhanyavad Vijay and Nikia !
ReplyDelete