उभ्या जन्माचे चैतन्य
आज या क्षणात आहे
जरी दिसत नसले तरी
चांदणे मनात आहे..
विरहाच्या या क्षणी
अश्रू नकोत उदास
सुखद आठवणींनी येतील
भरून अंतरश्वास.
सहवास सुटला देठाचा
तरी फुल अजुनी गाते
फुलाचे अन देठाचे
आहे सुगंधाचे नाते
- गौरव पांडे
No comments:
Post a Comment